राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 14 झाली आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या आधी, रुग्णांची संख्या 11 होती. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचे टोपे यांनी सांगितले. या रुग्णांच्या नातेवाईक आणि निकटवर्तीयांचीही तपासणी केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत, असं टोपे म्हणाले.