कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय, 11 मार्चला मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. काल संध्याकाळी कर्नाटकात कलबुर्गी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे
पण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असं अजिबात नाहीये. संशोधकांना वाटतं की दर हजारपैकी मृतांचं प्रमाण हे पाच ते 40 असू शकतं. पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ, म्हणजेच साधारण 1 टक्के नक्कीच आहे. म्हणजेच हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत.
अशाच जगभरातल्या काही लोकांशी बीबीसीने संपर्क साधला आणि कोरोनाच्या जबड्यातून बाहेर ते कसे बाहेर पडले याची गोष्ट जाणून घेतली.
11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला
ब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श जानेवारीत सिंगापूरला गेले होते, तेव्हा त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. मात्र ते कळण्याच्या आतच ते सिंगापूरहून फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिसॉर्टवर थांबले.
तिथे त्यांच्यापासून आणखी 11 जणांना लागण झाली. यांच्यापैकी पाच जण इंग्लंडमध्ये आले, पाच फ्रान्समध्येच होते आणि एका व्यक्ती स्पेनच्या मायोरका बेटावर आहे.
मग मायदेशी परतल्यावर दोन डॉक्टरांना त्यांच्यापासून लागण झाल्यामुळे दोन स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले होते. अखेर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ते आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
बीबीसीला त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं मी ऐकलं. "मला आधी एका खोलीमध्ये वेगळं ठेवण्यात आलं होतं. मग मला घरीही इतरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं.
"लक्षणं कोरोनाचीच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मला विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं. आत्ता मी तिथेच आहे आणि बचावात्मक उपाय म्हणून माझ्या घरच्यांनाही वेगळं राहायला सांगण्यात आलंय."