COVID 19 ची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?

Image result for covid 19 virus


कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होऊनही रुग्ण जीव गमावत आहेत, त्यामुळे यावर युद्धपातळीवर काम करणारे डॉक्टरांची एका अनोळखी शत्रूशी लढाई सुरू आहे, असं चित्र आहे.


कोरोना व्हायरस शरीरावर नेमकं कसं आक्रमण करतो? संक्रमणानंतर शरीरात कोणत्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात?


कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारी पडण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता किती आहे? यावर काय उपाय आहे?


चीनमधल्या वुहान शहरातील जिन्यितान हॉस्पिटलमधील कार्यरत डॉक्टरांनी या प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे.


कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या 99 रुग्णांवर उपचार केल्यानंतरचा सविस्तर वृतान्त लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.


वुहानमधील जिन्यितान हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 99 रुग्णांना आणण्यात आलं. त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणं दिसत होती. या रुग्णांना फुप्फुसात त्रास जाणवत होता. फुप्फुसातून ऑक्सिजन रक्तात सामील होतो. तिथे पाणी जमा झालं होतं.


मृत्यू होण्याची सुरुवातीची घटना


कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जे दोन रुग्ण सर्वांत आधी दगावले, ते अगदी निरोगी दिसत होते. त्यांना प्रदीर्घ काळापासून सिगारेटचं व्यसन होतं. या कारणामुळे त्यांची फुप्फुसं कमकुवत झाली असावीत.


61 वर्षीय रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणं दिसत होती.


त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा त्यांच्या शरीरात होऊ शकला नाही.


या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. तरीही त्या व्यक्तीचं फुप्फुस बंद पडलं. त्यानंतर थोड्या वेळात त्या व्यक्तीचं हृदय काम करणंही थांबलं.


दुसऱ्या रुग्णाचं वय 69 होतं. त्या माणसालाही श्वास घ्यायला त्रास होत होता. कृत्रिम पद्धतीने त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.


त्या माणसाचा रक्तदाब कमी झालेला असताना न्यूमोनियाने त्याचं आयुष्य संपलं


किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांमुळे लोक स्वत:ला रुग्णालयात भरती करून घेत नसावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.