स्त्री जीवन असेच असते,
जगता जगता स्वतः च्या अगोदर
दुसर्याचा विचार करत
जगायचे असते ....
पण तिच्या कर्तव्याला
काडीचीही किम्मत नसते....
घर तिचेच आहे,
याच भ्रमात तिला ठेवलेले असते...
काम एक धड झाले नाही तरी
तिला धारेवर धरलेले असते....
नवरा, मुले, नातेवाईक कधीच,
तिच्यावर खुश झालेले नसते....
सुखाची झोप तिच्या नशिबी कधीच नसते....
आयुष्याच्या वाटेवरती दिवस
असेच जात असते....
आणि हो....
अगदी खरे सांगायचे तर.....
तिचा हा.....
निरोप समारंभ तिला शेवटचे
खरे सुख देऊन जात असते .....
स्त्री जीवन असेच असते*