बलात्कार आणि फाशीची शिक्षा

Image result for RAPE


."वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या देशांना रिटेशनिस्ट म्हटलं जातं," अशी माहिती नीतिका विश्वनाथ देतात.


त्यांच्या मते, "अनेक रिटेशनिस्ट देशांमध्येही अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा दिली जात नाही. पण लहान मुलांच्या लैंगिक हिंसेसाठी कठोर शिक्षेची कायद्यात तरतूद आहे."


'हक सेंटर फॉर चाईल्ड राईट्स'ने अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वेगवेगळ्या देशांत कोणती शिक्षा सुनावली जाते, याविषयी 2016 मध्ये एक रिपोर्ट लिहिला आहे.


मलेशियामध्ये बाल लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते.


सिंगापूरमध्ये चौदा वर्षांच्या बालकावर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला 20 वर्षं तुरुंगवास भोगावा लागतो. शिवाय कोडे मारण्याची आणि दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते