कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीलाही लागण

Image result for justin tudo wife


जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यामुळं सोफी ग्रेगोइर ट्रुडो आणि जस्टिन ट्रुडो यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलंय.


सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांची तब्येत ठीक असल्याची माहिती कॅनडाच्या पंतप्रधानांच्या माध्यम संचालकांनी पत्रकाद्वारे दिली.


जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसांसाठी वेगळ्या जागी ठेवण्यात येणार आहे.


सोफी या नुकत्याच यूकेतून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये फ्लूसदृश लक्षणं जाणवल्यानं त्यानं डॉक्टरांकडे नेण्यात आलं, अशी माहिती स्वत: जस्टिन ट्रुडो यांनी ट्विटरवरून दिलीय.


तर इतरांपासून वेगळं ठेवण्यात आल्यानंतर सोफी ग्रेगोइर ट्रुडो यांनी एक पत्रक काढलं आणि लोकांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली. त्यात त्या म्हणाल्या, "या लक्षणांमुळं मला अस्वस्थ वाटतंय, पण मी बरी होऊन परत येईन."


'जस्टिन ट्रुडो काम सुरूच ठेवणार'


इतरांपासून 14 दिवस वेगळं ठेण्यात आलं असूनही जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली. तसंच, ट्रुडो उद्या कॅनडाच्या जनतेला उद्देशून भाषण करणार आहेत.


"जस्टिन ट्रुडो यांची तब्येत ठीक असून, त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. केवळ खबरदारी आणि डॉक्टरांच्या सूचना म्हणून त्यांना 14 दिवस वेगळं ठेवण्यात आलंय," अशी माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली.


ऑस्कर विजेते अभिनेते टॉम हँक्स यांनाही कोरोना व्हायरसची लागण


दोनच दिवसांपूर्वच ऑस्कर विजेते अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती टॉम यांनी जाहीर केली आहे.